मोदी नाहीतर शाह होणार पंतप्रधान? उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर

‘मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी घणाघाती टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. टीव्ही9 च्या ग्लोबल समिटमध्ये ते बोलत होते. अमित शाह यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय

मोदी नाहीतर शाह होणार पंतप्रधान? उद्धव ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर
| Updated on: Feb 28, 2024 | 4:24 PM

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : ‘मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी घणाघाती टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. टीव्ही9 च्या ग्लोबल समिटमध्ये अमित शाह यांची मुलाखत होती त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, अमित शाह यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत म्हणाले, घराणेशाहीची गोष्ट करता, जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का, जय शहा आपले चिरंजीव आहेत ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठोकल्या की सचिनेपक्षा जास्त शतकं केलीत? की कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या त्यांनी? असा सवाल राऊत यांनी केला. कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलतायत, ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे, इथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही. माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पण मी अजून सांगतो नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.