मग राजीनामा कसा मंजूर होईल? छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचा हल्लाबोल काय?

मग राजीनामा कसा मंजूर होईल? छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Feb 04, 2024 | 3:54 PM

छगन भुजबळ यांनी मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला, असल्याचा मोठा गौप्यस्फोट ओबीसी ऐल्गार मेळाव्यातून केला. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले आहे.

मुंबई, ४ फेब्रुवारी, २०२४ : गेल्या १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असे सांगत छगन भुजबळ यांनी मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला, असल्याचा मोठा गौप्यस्फोट ओबीसी ऐल्गार मेळाव्यातून केला. यानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटताना दिसताय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचे म्हणतात पण त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीत सहभागी झाल्याचे संजय राऊत म्हटले. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणीतरी भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केले जाते ही परंपरा आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तर छगन भुजबळ यांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे. छगन भुजबळ यांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस बोलतात मग राजीनामा कसा मंजूर होईल, असा सवालही राऊतांनी केला.

Published on: Feb 04, 2024 03:54 PM