Sanjay Raut : सेना-भाजप युती तुटावी असं त्यांना वाटतं नव्हतं; राऊतांनी घेतली फडणवीसांची बाजू
Sanjay Raut Take Side Of CM Fadnavis : उबाठा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कड घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.
मी एक नक्की सांगेन, 2014मध्ये देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा एका-एका जागेवर 72 तास चर्चा झाली होती, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सेना भाजप युतीवर भाष्य केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या संपूर्ण चर्चेच्या वेळी मी त्यामध्ये होतो. त्यावेळी ओम प्रकाश माथुर भाजपचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असं राऊत म्हणाले.
Published on: Mar 25, 2025 12:45 PM
Latest Videos

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
