ट्विट करत संजय राऊत यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, ... तर तुम्ही...

ट्विट करत संजय राऊत यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, … तर तुम्ही…

| Updated on: Mar 08, 2023 | 11:04 AM

खासदार संजय राऊत यांनी ट्विटमधून विरोधकांवर निशाना साधला. त्यांनी त्यात, सर्वकाही समजूनही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकणार नाही असं म्हटलं आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. याच्या आधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमच्या मित्रांना भांग पाजवली गेली या टीकेला उत्तर दिलं. भांग कुणी पाजली? त्यांनीच का? असा सवाल करतानाच महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? ती भांग उतरली की सत्ता जाईल, असं म्हटलं. त्याचवेळी त्यांनी एका दुसऱ्या ट्विटमधून विरोधकांवर निशाना साधला. त्यांनी त्यात, सर्वकाही समजूनही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकणार नाही असं म्हटलं आहे.

Published on: Mar 08, 2023 11:04 AM