‘मविआचे ते नेते, बाकी ज्याला जे पटेल त्यानं ते करावं’; राऊत यांचा शरद पवार यांना सल्ला
त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेदांसह दुरावा आल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र अजित पवारांनी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरूनच काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उठवले होते.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना पुण्यात टाळलं होतं. त्यामुळे त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेदांसह दुरावा आल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र अजित पवारांनी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरूनच काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उठवले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आता यावरून सवाल उभे केले आहेत. त्यांनी, शरद पवार हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेतच त्याचबरोबर ते मविआचेही नेते आहेत. ते इंडिया आघाडीचे नेते आहेत. सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. मात्र एक संवादाची भूमिका असते. ती आम्ही करतो. राजकारणात त्या भूमिकांचा काय परिणाम होईल याचा आम्ही विचार करतो. तसा शरद पवार यांनी देखील करायला हवा. राजकारणात मार्ग वेगळे होतात, तेव्हा मतदारांच्या मनात संभ्रम राहू नये यासाठी प्रमुख नेत्यांनी काळजी घ्यायची असते असं आम्हाला वाटतं बाकी ज्याला जे पटेल त्यानं ते करावं असा टोला त्यांनी लागवा आहे.