राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंची टीका, पवार, लंकेंनाही लगावला टोला
सध्या अहमदनगर जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
अहमदनगर : सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Dec 07, 2021 11:06 AM
Latest Videos