Ajit Pawar : अजित पवार यांचा 'सिंचनदादा' म्हणून कुणी केला उल्लेख? अजितदादांच्या टीकेला कुणाचं प्रत्युत्तर?

Ajit Pawar : अजित पवार यांचा ‘सिंचनदादा’ म्हणून कुणी केला उल्लेख? अजितदादांच्या टीकेला कुणाचं प्रत्युत्तर?

| Updated on: Oct 14, 2023 | 11:16 AM

tv9 marathi special report | अजित पवार यांचा सिंचनदादा म्हणत सामनातून टीका करण्यात आली. त्याला सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत जो दावा केलाय त्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | खासदार सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानं राज्यात, विशेषत: महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ माजलीय. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंचनदादा असा उल्लेख करत जोरदार टीका करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय. इतकंच नाही तर अजित पवार किंवा मी सिंचन घोटाळा वा इतर कुठल्याही घोटाळ्यात आरोपी नाहीत. तर संजय राऊत हे आरोपी म्हणून तुरुंगात जाऊन आलेत, असा जोरदार टोला तटकरे यांनी लगावलाय. दरम्यान, तटकरेंच्या दाव्यानंतर आता संजय राऊत यांनी तटकरेंना प्रत्युत्तर दिलंय. तर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 14, 2023 11:16 AM