Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, काय व्यक्त केली खंत?

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, काय व्यक्त केली खंत?

| Updated on: Nov 03, 2023 | 12:38 PM

Supriya Sule letter to om Birla : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट करून हे पत्र जोडले आहे.

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवायांसाठी परिशिष्ट 10 नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे एका मागणी पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून असे म्हटले की, ‘मी 4 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत सुनील तटकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी अपात्रता याचिका दाखल केली होती. चार महिने उलटले तरी कारवाई झाली नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा खरा आत्मा आणि लोकशाही तत्त्वे टिकवून ठेवण्यासाठी अशा याचिकांचे वेळीच निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. माझी विनंती आहे की कृपया याचिकेवर निर्णय देण्यास अधिक विलंब करू नका.’

Published on: Nov 03, 2023 12:38 PM