आधी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात, आता सुनेत्रा पवारांचा प्रवीण मानेंकडून लोकसभेचा प्रचार

आधी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात, आता सुनेत्रा पवारांचा प्रवीण मानेंकडून लोकसभेचा प्रचार

| Updated on: Apr 08, 2024 | 12:31 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रचारक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचा निर्धार केला होता. मात्र आज तेच प्रवीण माने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसताय

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचारक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे निवडणुकीआधीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना चांगलाच धक्का बसलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रचारक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचा निर्धार केला होता. मात्र आज तेच प्रवीण माने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसताय. प्रवीण माने आणि माने कुटुंब हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षात फूट पडल्यानंतर प्रवीण माने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. तर प्रवीण माने हे सुप्रिया सुळेंच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख होते. ज्या माने कुटुंबीयांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय त्या माने कुटुंबाविषयी जाणून घेऊय़ा…

Published on: Apr 08, 2024 12:31 PM