सरकार शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला तयार नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल काय?
राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका हतबल शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडीओ ट्वीटवर शेअर केलाय. तर या व्हिडीओसोबत शेतकऱ्यांची व्यथा मांडत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचाही आक्रोश ऐकण्यास तयार नाही, हेच यावरुन स्पष्ट होते. या सरकारला शेतकरी माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटलंय
नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३ : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका हतबल शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडीओ ट्वीटवर शेअर केलाय. तर या व्हिडीओसोबत शेतकऱ्यांची व्यथा मांडत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकरी आपल्या पीकाला तळहातावरील फोडासारखा जपतो.पण जेंव्हा त्याला बाजार मिळत नाही तेंव्हा तो हताश होतो. यावेळी कांद्याचा बाजार मिळाला नाही याला सर्वस्वी केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत आहे. शासनच जेंव्हा शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतं तेंव्हा त्याचा आक्रोश, संताप संसदेच्या पटलावर मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं आहे. आम्ही शेतकऱ्यांचा हाच आक्रोश संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला लोकसभेतून निलंबित करण्यात आलं. हे सरकार शेतकऱ्यांचाही आक्रोश ऐकण्यास तयार नाही, हेच यावरुन स्पष्ट होते. या सरकारला शेतकरी माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय.