इतना तो हक्क बनता है बच्चों का… सुप्रिया सुळे यांचा कुणाला खोचक टोला?
सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्षातील लोकं पक्ष सोडून जात आहे, असा गंभीर आरोप शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार महिला नेत्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केला. दरम्यान, सोनिया दुहान यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सुप्रिया सुळेंनी पलटवार करत खोचक टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. तर सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्षातील लोकं पक्ष सोडून जात आहे, असा गंभीर आरोप शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार महिला नेत्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केला. पुढे सोनिया दुहान यांनी असेही सांगितले की, मी आजपर्यंत पक्ष सोडला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. सुप्रिया सुळेंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान, सोनिया दुहान यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सुप्रिया सुळेंनी पलटवार करत खोचक टोला लगावला आहे.