... तर मिश्या आणि भुवया काढून टाकेन; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना चॅलेंज

… तर मिश्या आणि भुवया काढून टाकेन; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना चॅलेंज

| Updated on: Mar 24, 2023 | 7:17 AM

शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर थेट हल्ला चढवत जोरदार टीका केली आहे

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आताही त्यांनी थेट आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाच चॅलेंज दिले आहे. तसेच थेट समोर येऊन दाखवा असा इशाराच दिला आहे. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर थेट हल्ला चढवत जोरदार टीका केली आहे. तसेच उदयनराजे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा. भ्रष्टाचार केला असेल तर मी माझ्या मिश्या आणि भुवया काढून टाकेन. नगर विकास आघाडीने त्यांच्याच काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी केला आहे.

 

Published on: Mar 24, 2023 07:17 AM