कधी ना कधी तरी..., सातारच्या जागेवरून उदयनराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, रोख नेमका कुणाकडे?

कधी ना कधी तरी…, सातारच्या जागेवरून उदयनराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, रोख नेमका कुणाकडे?

| Updated on: Apr 08, 2024 | 1:17 PM

'सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे. 'छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून नेहमी वाद निर्माण केला जातोय. आणि आता सातारच्या जागेवरून कधी ना कधी तरी लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा करावी लागेल'

कधी ना कधी तरी लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा करावी लागेल, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून नेहमी वाद निर्माण केला जातोय. आणि आता सातारच्या जागेवरून कधी ना कधी तरी लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा करावी लागेल’, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीवरुन उदयनराजे भोसले यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा सवाल उपस्थित केला जात असून चर्चांना उधाण आलं आहे. आज सोमवारी संध्याकाळी सातारा विकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हाव, असं सातारा विकास आघाडीकडून आवाहन करण्यात येत आहे.

Published on: Apr 08, 2024 01:17 PM