उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री; म्हणाले, ‘मास्तर… पोरगं नापास झालं, आता काय करायचं..’
आता उदयनराजे भोसलेंनी चक्क निळू फुले यांचीच मिमिक्री करत धमाल उडवली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघनिहाय आभार दौरा केला. पाहा व्हिडिओ नेमकं काय म्हणाले?
खासदार उदयनराजे भोसले यांनी निळू फुले यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. कराडमधील विजयी आभार मेळाव्यात त्यांनी निळू फुले यांच्यासारखा आवाज काढला. परीक्षेला बसलेल्या मुलाचं उदाहरण देऊन कराड दक्षिणच्या मतदाराचं उदयनराजेंनी कौतुक केलं. खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या डायलॉगबाजीनं चर्चेत असतात. तरुणाईमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. उदयनराजे स्टेजवर आले की टाळ्या आणि शिट्ट्याच असतात. कधी बाईक राईड तर कधी कॉलर उडवण्याची स्टाईल उदयनराजे नेहमीच चर्चेत असतात. आता उदयनराजे भोसलेंनी चक्क निळू फुले यांचीच मिमिक्री करत धमाल उडवली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघनिहाय आभार दौरा केला. कराड दक्षिणच्या दौऱ्यात त्यांनी निळू फुले यांची मिमिक्री करत उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडलं. पाहा व्हिडिओ नेमकं काय म्हणाले?
Published on: Jun 24, 2024 04:30 PM
Latest Videos