साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचं साकडं, बघा काय मागितलं मागणं

साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचं साकडं, बघा काय मागितलं मागणं

| Updated on: Mar 12, 2023 | 4:35 PM

VIDEO | साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेत स्वतः सहभागी होऊन उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन, म्हणाले...

सातारा : साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल होत आहेत. या बगाड यात्रेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपली उपस्थिती लावली असून यावेळी बगडाचे त्यांनी दर्शन घेतले आणि त्यांनी या मानाच्या बगाडाची खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून पिढ्यान पिढ्या या गावात लोक एकत्र येत आहेत. ज्या पध्दतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहायला हवी तरच या भागाचे आणि देशाचे कल्याण होईल, असे त्यांनी म्हटले. यावेळी उदयनराजे यांनी देवाला साकडं देखील घातलं. ते म्हणाले, मी या देवाला एकच मागणी मागितली लोकांचे भलं होवो उत्कर्ष होवो आणि सर्वाना चांगल्या उंचीवर पोहचावे, अशी मागणी या निमित्ताने उदयनराजे यंनी केली.

Published on: Mar 12, 2023 04:35 PM