VIDEO : Chiplun Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य, खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचा बहुसंख्या भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, बाजारपेठा पूर्णत: पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरेच्या घरे बुडाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचा बहुसंख्या भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, बाजारपेठा पूर्णत: पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरेच्या घरे बुडाली आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. अशा भीषण स्थितीमुळे शिवसेना खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना होत आहेत. खासदार विनायक राऊत हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे , परशूराम नगर याबरोबरच खेंड परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत.
Latest Videos