Pune Suicide : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल

Pune Suicide : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल

| Updated on: Jan 15, 2022 | 11:08 PM

सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहून अमर स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. कोरोनामुळे आधीच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यात मराठा आरक्षणही रद्द झाल्यामुळे केवळ एका गुणासाठी अमर पीएसआयच्या शारिरीक परिक्षेतून बाहेर पडला होता.

पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात घडली आहे. काल रात्री सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अमर मोहिते असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.