MPSC विद्यार्थ्यांचं आज पुन्हा पुण्यात आंदोलन, आता ‘या’ नव्या मागण्या
2025 पासून नवा पॅटर्न लागू करण्याची मागणी मान्य, तरीही पुन्हा MPSC विद्यार्थी करणार आंदोलन
पुणे : 2025 पासून MPSC नवा पॅटर्न, अभ्यासक्रम लागू करण्याच्या मागणीसाठी MPSC विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत शिंदे फडणवीस सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र तरीही आज MPSC विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजेपासून पुण्यातील अलका चौकात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. MPSC नवा पॅटर्न, अभ्यासक्रम हा यंदाच म्हणजे 2023 पासूनच लागू करावा, यासह यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षा घेतली जावी, अशा नव्या मागणीकरत हे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरणार आहेत. या नव्या मागणीनंतर MPSC विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एका गटाकडून MPSC नवा पॅटर्न, अभ्यासक्रम हा 2023 पासून लागू करावा अशी मागणी होतेय तर दुसऱ्या गटाकडून MPSC नवा पॅटर्न, अभ्यासक्रम हा 2025 पासूनच लागू करावा अशी मागणी आहे.