आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एसटीचा परिवहन विभागात समावेश करा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मागणी

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एसटीचा परिवहन विभागात समावेश करा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मागणी

| Updated on: Aug 28, 2021 | 1:26 PM

राज्य सरकारनं आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एसटी महामंडळाला परिवहन विभागात समाविष्ट करुन घ्यावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यानी केली आहे.

धुळे जिल्ह्यातील कमलेश बेडसे या धुळे आगारातील चालकानं आत्महत्या केलेली आहे. एसटी महामंडळाचा अनियमित पगार आणि वेळेवर न होणारा पगार यामुळं आत्महत्या करत असल्याचं कमलेश बेडसे यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे. बेडसे यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपये दिले आहेत. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये तीन महिन्याचं वेतन न मिळाल्यानं पगार दिले नव्हते. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती. मागील सरकारच्या काळातील तोटा आणि कोरोनामुळं एसटी महामंडळाला 10 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. राज्य सरकारनं आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एसटी महामंडळाला परिवहन विभागात समाविष्ट करुन घ्यावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यानी केली आहे.