MSRTC Employees Strike : टकल्या… हेकण्या, बैठकीवेळी नेमकं काय घडलं? ST कर्मचाऱ्यांची साडे 6 हजार वाढ, श्रेयाचे 6 भागीदार

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ नेमकी कशी झाली? या वेतनवाढीचे श्रेय घेण्यासाठी नेमका काय गोंधळ झाला? सरकारने केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामगार संघटनेचे कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने यावेळी तेथे येऊन मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली.

MSRTC Employees Strike :  टकल्या... हेकण्या, बैठकीवेळी नेमकं काय घडलं? ST कर्मचाऱ्यांची साडे 6 हजार वाढ, श्रेयाचे 6 भागीदार
| Updated on: Sep 06, 2024 | 10:57 AM

एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यापैकी पगारवाढीची मागणी मान्य झाल्यानंतर अखेर लालपरीचा संप मागे घेण्यात आला. मात्र अशा निर्णयानंतर श्रेयवाद कसा रंगतो, याचं ज्वलंत उदाहरण सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पाहायला मिळालं. पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कुणी एकच छंद गोपीचंद असं म्हणत होतं. तर कोणी नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा देत होतं. तर काहींनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले तर काही जणांनी उदय सामंतांना श्रेय दिलं. तर कोणी एसटी कर्मचाऱ्यांचा एकतेचे नारे दिलेत. दोन दिवसांच्या संपात एकूण ११ एसटी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सदावर्तेंची संघटना कुठेच नव्हती, याऊलट संप पुकारणाऱ्यांना सदावर्ते किडे म्हणाले. पण सरकारच्या निर्णयानंतर गुलाल उधळण्यात सदावर्ते सर्वात पुढे दिसले. आधी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट साडे सहा हजारांची वाढ झाली असल्याचे सांगितले गेले, नंतर २०२१ साली करण्यात आलेली वाढ साडे ६ हजारांपर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.