MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांच्या २ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाला यश, महामंडळाकडून कोणतं परिपत्रक जारी?

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांच्या २ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाला यश, महामंडळाकडून कोणतं परिपत्रक जारी?

| Updated on: Oct 06, 2023 | 4:02 PM

VIDEO | गेल्या दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला यश, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, ही मागणी कर्मचाऱ्यांची होती. आता एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | गेल्या दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला यश आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप तब्बल ५० हून अधिक दिवस सुरू होता. यादरम्यान, एसटी सेवा पूर्णतः ठप्प होती. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, सातवं वेतन आयोग, वार्षिक वेतन वाढ यासारख्या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. या मागण्यांसाठी हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारले होते. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, ही मागणी कर्मचाऱ्यांची होती. आता एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनश्रेणीसाठी गुरुवारी महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्याचे परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले.

Published on: Oct 06, 2023 03:58 PM