MSRTC : नव्या रुपातील ‘हिरकणी’ लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत, काय असणार वैशिष्ट्य बघा

MSRTC : नव्या रुपातील ‘हिरकणी’ लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत, काय असणार वैशिष्ट्य बघा

| Updated on: Mar 18, 2023 | 9:20 PM

VIDEO | महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार नवी हिरकणी, पुण्यात दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत तयार होणार बसेस, काय असणार वेगळेपण?

मुंबई : रस्ता तिथं एसटी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या दोन ब्रीद वाक्यावर धावणारी लालपरी कोरोना महामारीनंतर पुन्हा भरधाव वेगात रस्त्यावर धावण्यास सज्ज होत आहे. अशातच आरामदायी प्रवासासाठी साध्या बसला देखील पुश बॅक सीट बसविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. दापोडी, हिंगणा (नागपूर), चिकलठाणा (संभाजीनगर) अशा तीन कारखान्यात एसटी गाड्यांची बांधणी सुरू आहे. दापोडी कारखान्यात ७०० बसेसची बांधणी सुरू आहे. येथे निमआराम श्रेणीच्या २०० हिरकणी एशियाड), आरामदायी श्रेणीच्या ५० नॉन एसी स्लीपर, ५० सीएनजी, ५०० लालपरी साध्या बसेस अशा ७०० बसेसची बांधणी सुरू आहे. दापोडी कारखान्यातून ५०० साध्या बसेसपैकी १४३ बसेस बांधून बाहेर पडल्या आहेत. उरलेल्या साध्या बसेसना आता आरामदायी ‘पुश बॅक’ सीट बसविण्यात येणार आहेत. या बसेस जून २०२३ पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

Published on: Mar 18, 2023 09:20 PM