MSRTC Bus Pass : ‘लालपरी’ने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेतच…
गावखेड्यात अजूनही प्रवासी एसटी बसवर अवलंबून आहे. तर काही लहान गावात शाळेत जाण्यासाठी एसटी बस शिवाय कोणताच पर्याय नसल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, अशाच विद्यार्थांसह बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे
रस्ता तेथे एसटी, प्रवाशांच्या सोयीसाठी अशी ब्रीद वाक्य असणाऱ्या एसटीने तिच्या ब्रीद वाक्याप्रमाणेच प्रवाशांना सेवा दिली आहे. गावखेड्यात अजूनही प्रवासी एसटी बसवर अवलंबून आहे. तर काही लहान गावात शाळेत जाण्यासाठी एसटी बस शिवाय कोणताच पर्याय नसल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, अशाच विद्यार्थांसह बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. लालपरी अर्थात एसटी बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘लालपरी’ने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी बसचा पास मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज नाही. एसटी पास थेट तुमच्या शाळेत या मोहिमेतंर्गत शाळेतच आता पास मिळणार आहे.