एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याकडून मोठा दणका देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाही
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासंबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याकडून मोठा दणका देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाही. तर सर्वसाधरण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी तक्रार केली होती. ‘जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता एसटी कॉपरेटिव्ह बँकेवर आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू त्यांनी निर्णय घेतला होता आणि अशी शंकाच आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. खरंतरं एसटी कर्मचारी हवालदिल झालाय. गेल्या ८ महिन्यांपासून आम्हाला कर्ज मिळत नाही. अशातच सर्वसाधरण सभेत जे पोटनियम बदलायचे होते त्यांची माहिती सभासदांना दिली नाही. यासंदर्भातील तक्रार मी सहकार आयुक्तांकडे केली होती’, असं संदीप शिंदेंनी सांगितले.