MSRTC : एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग… बस चालकाचा बघा प्रताप, व्हिडीओ व्हायरल
लातूर-पुणे मार्गावरच्या कुर्डुवाडीजवळील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एसटी महामंडळाच्या बस चालकाचा हा व्हिडीओ असून त्याच्या एका हातात मोबाईल फोन आणि दुसऱ्या हातात बसचं स्टेअरिंग दिसतंय.
राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या एसटी बसचं प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तेथे एसटी असं ब्रीद वाक्य आहे. मात्र या ब्रीद वाक्यानुसार, आता प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागणार का? असा सवाल मनात उपस्थित होतोय. लातूर-पुणे मार्गावरच्या कुर्डुवाडीजवळ एक धक्कादायक प्रकार पाहिला मिळाला. एसटी महामंडळाच्या बसच्या चालकाच्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात स्टेअरिंग असल्याचे पाहायला मिळाले. ही एसटी बस इंदापूर आगाराची असल्याची माहिती मिळत असून या आगारातील बस चालकाचा प्रताप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीजवळ एसटी बस चालवताना एसटी बस चालकाकडून मोबाईलचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बस चालवताना बस चालकाने आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं असतं. कारण एका चालकाच्या हातात बसमधील ५० प्रवाशांचा जीव असतो. बस चालकावर विश्वास ठेवून एसटीचे प्रवासी निश्चिन्त होऊन प्रवास करत असतात. मात्र सोलापूर जिल्ह्यातील हा व्हिडीओ पाहून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
