Shrirang Barge : ‘गुणरत्न सदावर्ते लबाड लांडगा, दुटप्पी भूमिकेचा; उद्यापासून होणाऱ्या आंदोलनाला कुणी बळी पडणार नाही’
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | एसटी कर्मचाऱ्यांच उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही. या आंदोलनाला कर्मचारी बळी पडतील असं वाटत नाही, असे स्पष्ट मत एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे. वकील महोदय यांनी आंदोलन घेतलंय त्यांची भूमिका दुटप्पी आहे. मागच्या वेळीच त्यांनी गुलाल उधळला मग आता आंदोलन केल जातंय या वकिलाने लबाडी केली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. तर 10 हजार पेक्षा गाड्या या वापरण्या योग्य नाही गाड्या घेण्यासाठी फाईल आहे पण ती शासनाने अडवली आहे. 2200 गाड्यांची फाईल का दाबून ठेवली त्याची फाईल दाबून कोणी ठेवली याची चौकशी झाली पाहिजे, असा सवाल त्यांनी केलाय. तर सातवा वेतन आयोग झाला पाहिजे पण या वकिलाला पाठिंबा नाही हा वकील कोणाचा तरी अजेंडा राबवतोय, वकील हे सर्वांची धूमजाव करतायत हा लबाड लांडगा आंदोलन करतोय, असे म्हणत सदावर्तेंवर थेट निशाणा साधलाय.