MSRTC BIG Breaking : ‘लालपरी’चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, ‘या’ मागण्यांसाठी उतरणार रस्त्यावर
एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. येत्या ९ आणि १० जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. येत्या ९ आणि १० जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं आणि प्रलंबित महागाई भत्त्याचीही एसटी कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आजपासूनच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांना इनडोअर आणि आऊटडोअर मेडिकल कॅशलेश योजना लागू करावी, एसटीचे खासगीकरण बंद करावे, वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात या विविध मागण्यांसाठी लालपरीचे कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. बघा व्हिडीओ…
Published on: Jun 27, 2024 01:55 PM
Latest Videos