Aurangzeb Treasure Video: शेतात सोनं अन् मुलघांचा खजिना असल्याची चर्चा, अफवा वाऱ्यासारख्या पसरली; रातोरात ‘या’ किल्ल्यावर लोकांची झुंबड
बऱ्हाणपुरातल्या असीरगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमिनीमध्ये सोनं असल्याची चर्चा सुरू झाली आणि लोकांनी थेट शेतामध्ये खोदकाम सुरू केलं. अद्याप तरी कुणाच्याही हाती सोनं लागलेलं नाही, मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालाय. अशातच शेतामध्ये आता सीसीटीव्ही लावण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली आहे.
बऱ्हाणपुरात मुघलकालीन खजिना शोधण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतकऱ्याला शेतात सीसीटीव्ही लावण्याची वेळ आली आहे. इथली गर्दी आणि नुकसान पाहता शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. खोदकाम होणाऱ्या बऱ्हाणपूर जिल्ह्याच्या असीरगड किल्ल्याच्या पायथ्याशी हरुण शेख या शेतकऱ्याचं शेता आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक सरपंच भागवत बोडाळे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. तर खोदकाम झालेल्या ठिकाणी आता एकही जण नाही. दरम्यान घटनास्थळी जर काही मिळालं तर ती शासकीय संपत्ती असेल असं बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांनी म्हटलं आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या किल्ल्याजवळ सोन्याचे शिक्के सापडत असल्याची अफवा पसरली आणि हजारो लोक रात्री बॅटरी, लोखंडी फावडे घेऊन इथं धडकली.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बऱ्हाणपुरातल्या असीरगडच्या आवतीभवतीच्या भूगर्भात सोनं असल्याच्या चर्चा तशाच जुनाच आहे. मात्र यावेळी या चर्चेत दोन गोष्टींची भर पडली आहे. पहिली म्हणजे छावा सिनेमात मराठ्यांनी मुघलांचा खजिना लुटून तो या भागात आणल्याचं दृश्य आहे आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलाच्या बांधकामावेळी इथल्या काही मजुरांना मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची चर्चा. यात दोन्ही गोष्टी पंचक्रोशीत वाऱ्यासारख्या पसरल्या आणि रात्रोरात शेकडो लोक असीरगडाभोवतीच्या भागात खोदकामासाठी पोहोचले. माहितीनुसार हे खोदकाम जवळपास तीन रात्री सुरू होतं. सुरुवातीला मध्यप्रदेश पोलिसांनी या गोष्टीला नकार दिला. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सोन्याच्या शोधासाठी खोदकाम केल्याचं स्पष्ट झालंय.