Cruis Drugs Case | आर्यन खानचे वकिल अॅड. मुकुल रोहतगी यांचा हायकोर्टातील युक्तीवाद

Cruis Drugs Case | आर्यन खानचे वकिल अॅड. मुकुल रोहतगी यांचा हायकोर्टातील युक्तीवाद

| Updated on: Oct 26, 2021 | 5:59 PM

मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. यावेळी आर्यन खानच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद सुरु आहे.

आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. आर्यन खान विरोधात कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडताना केलाय. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. यावेळी आर्यन खानच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद सुरु आहे.

मुकुल रोहतगींचा युक्तीवाद काय?

मला आज दुपारी जामीन अर्जावरील एनसीबीच्या उत्तराची एक प्रत मिळाली आणि मी एक प्रत्युत्तर दाखल केलं आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंटला आमंत्रित केलं होतं. दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं. ते दोघे एकत्र क्रुझवर गेले होते. आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.