Aarey Colony : आरे रस्ता वृक्ष छाटणीसाठी बंद! अनेकांची गैरसोय, छाटणीचा व्हिडीओही समोर

Aarey Colony : आरे रस्ता वृक्ष छाटणीसाठी बंद! अनेकांची गैरसोय, छाटणीचा व्हिडीओही समोर

| Updated on: Jul 25, 2022 | 12:26 PM

Aarey Colony Tree Cutting Video : आरेमध्ये पोलिसांच्या संरक्षणात झाडांची छाटणी केली जाते आहे.

मुंबई : आरेमध्ये (Aarey colony) पोलिसांच्या संरक्षणात झाडांची छाटणी केली जाते आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही छाटणी (Aarey Tree Cutting) केली जाते आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वेळोवेळी वृक्षांची छाटणी केली जाते. आरे कॉलनीतील रस्त्यालगत असलेल्या छाडांची वृक्षतोड केली जात असल्याचा अफवाही पसरल्या आहेत. मेट्रो कारशेडचा वाद आणि वृक्षतोड या वादाच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील वृक्षांच्या छाटणीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, वृक्षांच्या छाटणीसाठी आरेतील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. गोरेगाव ते पवई असा पल्ला गाठण्यासाठी अनेक जण आरेतून जाणं पसंत करतात. जोगेश्वरी विक्रोळी लिंक (JVLR) रोडवर सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकजण आरेतून जाण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे आता हा मार्ग प्रवासासाठी बंद केल्यानं अनेकांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, रविवारी आरे कॉलनीत आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यानंतर काही जणांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या होत्या.