Video : थोडक्यात मोठा अनर्थ टळला! वांद्रेत रिक्षावर झाड कोसळलं, रिक्षाचा चक्काचूर

Video : थोडक्यात मोठा अनर्थ टळला! वांद्रेत रिक्षावर झाड कोसळलं, रिक्षाचा चक्काचूर

| Updated on: Sep 16, 2022 | 11:40 AM

Mumbai Rains : थोडक्यात बचावल्याने रिक्षाचालकानेही सुटकेचा निश्वास सोडलाय. मुंबईत गेले काही वर्ष झाड पडून जीवितहानी होण्याच्या घटना पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, आता त्यात लक्षणीय प्रमाणात घट झाली असली, तरी झाड कोसळण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नसल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई : मुंबईत मुसळधार (Mumbai Rain) पावसाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे (Bandra Tree Collapse) येथे नॅशनल कॉलेजसमोर रिक्षावर झाड पडलं. आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत एका रिक्षावरच भलंमोठं झाड पडलं. या रिक्षाचा चक्काचूर झाला.  यात रिक्षाचं (Auto Rikshaw) प्रचंड मोठं नुकसान झालंय. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. रिक्षामध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्षा चालकाचं आर्थिक नुकसान झालंय. मुंबई सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम आता मुंबईच्या वेगावर होण्यासही सुरुवात झाल्याचं चित्र निर्माण झालंय. दरम्यान, झाड पडल्याची माहिती मिळताक्षणी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केलं आहे. थोडक्यात बचावल्याने रिक्षाचालकानेही सुटकेचा निश्वास सोडलाय. मुंबईत गेले काही वर्ष झाड पडून जीवितहानी होण्याच्या घटना पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, आता त्यात लक्षणीय प्रमाणात घट झाली असली, तरी झाड कोसळण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नसल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पालिकेकडून पावसाआधी वृक्ष छाटणी केली जाते. संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिकेकडून वृक्षांची छाटणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली होती. पण तरिही काही ठिकाणी जीर्ण झालेले वृक्ष हे मुसळधार पावसात कोसळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

 

Published on: Sep 16, 2022 11:40 AM