हिंमत असेल तर संजय राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून येऊन दाखवावं; शिवसेना नेत्याचं आव्हान

| Updated on: Mar 25, 2023 | 3:08 PM

Bharat Gogawale on Sanjay Raut : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच ठाकरेगटाला त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. पाहा...

मुंबई : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर संजय राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून येऊन दाखवावं, असं गोगावले म्हणालेत. आम्हाला 50 खोके, एकदम ओके म्हणाले. चोर म्हणाले. आता ह्यांनी किती खोके खाल्ले यांनी सांगावं. यांचा पर्दाफाशही लवकरच होणार आहे, असं गोगावले म्हणालेत. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भरत गोगावले यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी ठाकरेगटावर निशाणा साधलाय.

Published on: Mar 25, 2023 03:08 PM
…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; बावनकुळे यांचा राहुल गांधी यांना इशारा
‘गद्दारांना गाडायचं आणि पुन्हा ठाकरेंचा भगवा फडकवायचा’, राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन