मंत्रालय परिसरात एकच खळबळ! मंत्रालयाजवळ ब्लास्ट, वाहनांचं नुकसान, इमारतीच्या काचा फुटल्या अन्…
VIDEO | मंत्रालयाच्या बाहेर मेट्रोचं काम सुरु असताना मेट्रो कामाचा एक भाग म्हणून लावण्यात आलेल्या सुरुंगामुळे ब्लास्ट, ब्लास्टमुळे मंत्रालयाबाहेर असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान आणि इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | मुंबईतील मंत्रालय परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई मंत्रालयाच्या बाहेर मेट्रोचं काम सुरु असताना मेट्रो कामाचा एक भाग म्हणून सुरुंग लावण्यात आला होता. यामुळे एक लहान ब्लास्ट होणार होता. मात्र या ब्लास्टमुळे मंत्रालयाबाहेर असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. यासोबतच मंत्रालयाजवळ असणाऱ्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या समोर मेट्रोचं काम सुरु आहे. मेट्रोच्या कामानिमित्त छोटे-छोटे सुरुंग लावले जातात. पण त्याचाच फटका मंत्रालय परिसरात बसला आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर काही दगड उडून इमारतीच्या काचांवर आदळले. तर काही वाहनांवर आपटले. मात्र सुदैवानं कोणत्या नागरिकाला याचा फटका बसला नाही आणि मोठी दुखापत झाली नाही.
Published on: Aug 31, 2023 04:22 PM
Latest Videos