Video: धक्कादायक! बीएमसीच्या क्लीनअप मार्शलला कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं
संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अडवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला. त्यानंतरही कार चालकाने गाडी न थांबवता त्याला गाडीसोबत तसेच पुढे फरफटत नेले.
बीएमसी मार्शलला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या कार प्रवाशांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. बोनेटवर चढून अडवणाऱ्या बीएमसी मार्शलला मुजोर कार चालकाने गाडीवर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत असताना मार्शल कारच्या बोनेटवर आला होता. मुंबईतील सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
विनामास्क वावरणाऱ्या कार प्रवाशांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु असताना ही घटना घडली. संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अडवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला. त्यानंतरही कार चालकाने गाडी न थांबवता त्याला गाडीसोबत तसेच पुढे फरफटत नेले. सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. आरोपी कार चालक किंवा बीएमसी मार्शलविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.