गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली
मुंबईच्या गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीनेच धडक दिली आहे. बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. ज्यामध्ये १९ डिसेंबर रोजी सकाळी समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १०८ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप काही जण बेपत्ता असून मृतांची संख्या आता १३ वर पोहोचली असल्याची माहिती समोर येत आहे. काल समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवाशी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीने कशी धडक दिली त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नेव्हीच्या बोटीने जोरदार धडक दिली त्यानंतर ती बोट उलटली. नीलकमल बोटीत १०० हून अधिक प्रवासी होती. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झालाय तर काहींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातानंतर १०८ जणांना वाचवण्यात यश आलं. बचावानंतर ५६ जणांना जेएनपीटी रूग्णालयात नेण्यात आलं. यासोबत नेव्ही डॉकयार्डच्या रूग्णालयात ९ जणांना नेण्यात आलं. या घडलेल्या घटनेनंतर नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आलं. बोटीच्या मालकांचं नेमकं म्हणणं काय? नेमका बोटीचा अपघात नेमका कसा झाला? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट