Video : काल रात्री धक्काबुक्की; आज सोनू निगमच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
काल रात्री चेंबूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सेल्फी काढण्यावरून प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीनंतर सोनू निगमच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : काल रात्री चेंबूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सेल्फी काढण्यावरून प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीनंतर सोनू निगमच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेनंतर सोनू निगमने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमसोबत झालेल्या धक्काबुक्कीनंतर त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.पण सध्या सोनू निगम घरी नसून त्याच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आला आहे.
Published on: Feb 21, 2023 10:57 AM
Latest Videos