Mumbai Breaking | मुंबईत 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांचा तपास सुरू
रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली.
मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आलाय. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यास अडचण येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.
रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणांवर दाखल झालं. गेल्या दीड तासापासून या चारही ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू दिसून आलेली नाही.