मुंबईकरांनो सांभाळा! मुंबईची हवा बिघडली
मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याने मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून मुंबईकरांना आरोग्य सांभाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली असून सध्या मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० च्यावर गेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना आरोग्य सांभाळण्यासह काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० च्यावर गेल्याने दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाली झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईत सकाळपासूनच धुक्याची चादर पसरल्याचे चित्र असून धुलीकण वातावरणात पसरले आहेत. त्यामुळे मुंबईत वायू प्रदूषण झाले आहे. या वायू प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळताना दिसत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याने मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून मुंबईकरांना आरोग्य सांभाळण्याचे आवाहन केले जात आहे.