Mumbai Costal Road : व्हिंटेज कार अन् तिघांचा प्रवास, पुढे कोण? मागे कोण?; शिंदे, फडणवीस आणि दादांचा हा व्हिडीओ पाहिलाय?

Mumbai Costal Road : व्हिंटेज कार अन् तिघांचा प्रवास, पुढे कोण? मागे कोण?; शिंदे, फडणवीस आणि दादांचा हा व्हिडीओ पाहिलाय?

| Updated on: Jun 10, 2024 | 3:09 PM

मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा ४० ते ५० मिनिटांचा प्रवास केवळ अवघ्या ८ ते ९ मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता मंगळवारपासून (11 जून) खुली होत आहे. त्यानंतर हा प्रवास जलदगतीने होणार आहे. या मार्गिकेची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका विशेष व्हिंटेज कारमधून मुंबईतील कोस्टल रोडवरून एकत्रित प्रवास करत या बोगद्याची पाहणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर मुंबईतील कोस्टल रोडचं आज उद्धाटन करण्यात आलंय. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे .

Published on: Jun 10, 2024 03:09 PM