#मोदानी आंदोलन : वर्षा गायकवाड म्हणतात, ‘अदानीसाठी टी.डी.आर घोटाळा केला’
विरोधकांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून #मोदानी आंदोलन करत केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी नई चलेगी नई चलेगी तानाशाही नई चलेगी, मोदानी हटाव, धारावी बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अदानी यांनी याप्रकल्पावरून विरोध करण्यात आला आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | आज पावसाळी अधिवेशानाच्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. विरोधकांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून #मोदानी आंदोलन करत केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी नई चलेगी नई चलेगी तानाशाही नई चलेगी, मोदानी हटाव, धारावी बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अदानी यांनी याप्रकल्पावरून विरोध करण्यात आला आहे. यावरूनच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महत्वाचा आहे, पण चुकीच्या पद्धतीने टेंडर काढलं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर दोन जणांच्या हट्टामुळे अडानीला हा प्रकल्प देण्यात आला आहे. तर फक्त अदानी यांच्यासाठी टी.डी.आर घोटाळा केला जातोय असा देखील आरोप त्यांनी केला आहे. तर स्थानिकांनी याला विरोध असेल तिथली आमदार म्हणून आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर अडानी मोदींचे खास त्यामुळे #मोदानी हटाव धारावी बचाब हे आंदोलन केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. Maharashtra Politics