Mumbai Police Bharti : महसूल-वैद्यकीय अशा अनेक विभागानंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी भर्ती होणार?

Mumbai Police Bharti : महसूल-वैद्यकीय अशा अनेक विभागानंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी भर्ती होणार?

| Updated on: Oct 13, 2023 | 12:07 PM

tv9 Marathi Special report | महसूल आणि वैद्यकीय विभाग अशा अनेक विभागानंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी पोलीस भर्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत राज्य सरकारला इशारा दिला आहे. बघा काय केला सवाल

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | वेगवेगळ्या विभागातल्या कंत्राट भरतीनंतर आता पोलीस विभागातली कंत्राट भरती वादात सापडली आहे. महसूल-वैद्यकीय अशा अनेक विभागानंतर आता मुंबई पोलिसांतही कंत्राटी पोलीस भर्ती होणार आहे. यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत सरकारला इशारा दिलाय. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा कंत्राटी भरतीचा वाद उभा राहिला होता. तेव्हा फडणवीसांनी कंत्राटी भरती होणार नाही असं सांगत वेगवेगळ्या आस्थापनातून काही काळासाठी लोक घेतले जातात असं विधान केलं होतं. मात्र आरोपांनुसार अशाप्रकारची भरती पहिल्यांदाच होत आहे. आगामी नवरात्र उत्सव, दिवाळी, नाताळचे सण. त्यात पोलिसांवर येणारा ताण म्हणून ही भर्ती करण्यात येत असल्याचं सांगितलं जातंय. पण सण दरवर्षी येतच असल्यामुळे वेळेतच कायमस्वरुपी भर्ती का काढली गेली नाही? असा सवाल केला जातोय.

शिवाय कंत्राट भरतीचा निर्णय याआधीच्या सरकारनं घेतल्याचं आत्ताचं सरकार सांगतंय. मात्र चुकीच्या वाटपाच्या आरोपात आधीच्या सरकारच्या मंजुरींना जशी स्थगिती दिली गेली, मग त्याचप्रमाणे कंत्राट भरतीही चूक असेल तर आत्ताचं सरकार त्या निर्णयाला स्थगिती का देत नाही, असा सवाल केला जातोय.

Published on: Oct 13, 2023 12:07 PM