Mumbai | लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांची LTT टर्मिनसवर गर्दी? रेल्वे पोलिसांनी काय सांगितलं?
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे, काल दिवसभरात मुंबईत 20 हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या मिळाली आहे. तर, दुसरीकडे मुंबईच्या कुर्ला लोकमान्य तिलक टर्मिनसचे काही आज व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे, काल दिवसभरात मुंबईत 20 हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या मिळाली आहे. तर, दुसरीकडे मुंबईच्या कुर्ला लोकमान्य तिलक टर्मिनसचे काही आज व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लॉकडाऊनच्या भीतीमुळे मोठा संख्यामध्ये परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी कुर्ला टर्मिनलवर गर्दी कररत असल्याचं दिसतं. मात्र, या संदर्भात कुर्ला आरपीएफ पोलिसांनी माहिती दिली आहे. रात्री 11 ते बाराच्या सुमारास कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल मधून 6 ट्रेन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाण्यासाठी निघतात. मात्र, त्या ट्रेन मध्ये तिकिट बुकिंग केलेला लोकांना आत मध्ये सोडला जात आहे. याच ट्रेन मध्ये बसण्याची कुर्ला टर्मिनलवर प्रवाशांचा गर्दी दिसत आहे. या प्रवाशांचे कोरोना नियमांचे सर्व पालन करून ट्रेनमध्ये जायला परवानगी दिली जात आहे.