Mumbai Vaccination | मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर आज पुन्हा गोंधळ

Mumbai Vaccination | मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर आज पुन्हा गोंधळ

| Updated on: Jul 12, 2021 | 10:10 AM

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.

मुंबई: कोरोना लशींच्या तुटवड्यामुळे जवळपास तीन दिवस ठप्प असलेले मुंबईतील लसीकरण मोहीम सोमवारपासून पुन्हा एकदा सुरु झाली. लस घेण्यासाठी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centers) मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सकाळी सहापासून लोक लस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. अनेकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लसीकरणाचा वेग पाहता हे डोस फारतर दोन दिवस पुरतील. त्यानंतर पुन्हा काय करायचे, असा प्रश्न मुंबईतील आरोग्ययंत्रणांना पडला आहे.