Pradeep Sharma | प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक, 28 जूनपर्यत NIA कोठडी

Pradeep Sharma | प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक, 28 जूनपर्यत NIA कोठडी

| Updated on: Jun 17, 2021 | 5:12 PM

एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे.

एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली.

लोणावळ्याच्या रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्यानंतर जे जे रुग्णालयात शर्माची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सेशन कोर्टात नेल्यात आलं आणि 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.