Mumbai Crime | मुंबईच्या माहिम, दादर, शिवाजी पार्क, वरळी परिसरातून सायकलची चोरी करणार अटकेत
मुंबईच्या माहिम, दादर, शिवाजी पार्क आणि वरळी परिसरातून महागड्या स्पोर्ट सायकल चोरणाऱ्या टोळीच्या एका आरोपीला माहिम पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून माहीम पोलिसांनी तब्बल 24 स्पोर्ट सायकल जप्त केल्या आहेत. मात्र, या आरोपीच्या आणखी दोन साथीदारांचा शोध माहीम पोलीस घेत आहेत. Mumbai Crime Thives Arrested Who Stole Bicycle From Mahim dadar shivaji park
मुंबईच्या माहिम, दादर, शिवाजी पार्क आणि वरळी परिसरातून महागड्या स्पोर्ट सायकल चोरणाऱ्या टोळीच्या एका आरोपीला माहिम पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून माहीम पोलिसांनी तब्बल 24 स्पोर्ट सायकल जप्त केल्या आहेत. मात्र, या आरोपीच्या आणखी दोन साथीदारांचा शोध माहीम पोलीस घेत आहेत. अटकेतील आरोपी महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरी करत होता. त्याने ऐकूण 24 स्पोर्ट्स सायकल चोरी केल्या होत्या. त्या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अटकेतील आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. आरोपी दादर , वरळी , माहिम आणि इतर भागातून महागड्या स्पोर्ट्स सायकल टाळे तोडून चोरी करत होते आणि नंतर त्या विकत असत. आरोपीला कोर्टात हजर केलं असून त्याला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Mumbai Crime Thives Arrested Who Stole Bicycle From Mahim dadar shivaji park)