40 वर्षे जुन्या मागण्या, शेतकऱ्यांनी लगेच पूर्ण करण्याचा आग्रह धरू नये; शिंदेगटातील नेत्याचं वक्तव्य
शेतकऱ्यांचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलं आहे? पाहा...
मुंबई : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल रात्री आम्ही किसान लॉंगमार्च च्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनाही आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. त्यांच्या ज्या 14 मागण्या आहेत. त्यापैकी 40% मागण्यांवर सध्या एकमत झालेलं आहे. पण त्यांच्या काही मागण्या 30 वर्षे जुन्या आहेत. त्या मागण्या लगेच मान्य होतील, असं आम्हाला वाटत नाही. शेतकऱ्यांनीही त्याचा जास्त आग्रह नये. या मागण्या तीस वर्षापासून पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या पूर्ण होण्यात आताही अडचणी येत आहेत, असं दादा भुसे म्हणाले आहेत. आज तीन वाजता त्यांच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येईल त्यावेळी बसून यावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.