Dahi Handi 2024 : ‘मुंबईची गोष्टच वेगळी’, गौतमी पाटील म्हणाली, Love You मुंबईकर…

Gautami Patil at Borivali Magathane Dahihandi Festival : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आज मुंबईत असून बोरिवली मागाठाणे दहीहंडी फेस्टिव्हलमध्ये तिने आपली उपस्थिती दर्शविली. तर गर्दीसमोर जबरदस्त परफॉर्मन्स करत गोविंदा पथकांसह प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

Dahi Handi 2024 : 'मुंबईची गोष्टच वेगळी', गौतमी पाटील म्हणाली, Love You मुंबईकर...
| Updated on: Aug 27, 2024 | 1:49 PM

राज्यासह देशभरात आज दिवसभर दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडत आहे. बड्या राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून दिमाखदार दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईकरांनी गोविंदांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे सकाळपासून दिसतेय. अशातच मुंबईतील बोरिवली पूर्व देवीपाडा मैदानावर आमदार प्रकाश सुर्वे, त्यांचा मुलगा यांच्या तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य असा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आज मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात गौतमी पाटील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गौतमी पाटील टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. ती म्हणाली की, ‘मी ऑल महाराष्ट्र शो करत असते. मुंबईची गोष्टच वेगळी आहे. लव यू मुंबईकर’ दरवर्षी प्रकाश सुर्वे भव्य स्वरुपात दहीहंडी उत्सवाच आयोजन करत असतात. या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.