पायावर काठी मारली, आमच्या भविष्याशी खेळ सुरुय; अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या शेकडो तरूणी आक्रमक

पायावर काठी मारली, आमच्या भविष्याशी खेळ सुरुय; अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या शेकडो तरूणी आक्रमक

| Updated on: Feb 04, 2023 | 12:14 PM

अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या तरूणी आक्रमक झाल्या आहेत. आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला न्याय हवाय, अशी मागणी या तरूणींची आहे.

अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या तरूणी आक्रमक झाल्या आहेत. आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला न्याय हवाय, अशी मागणी या तरूणींची आहे. अग्निशमन दलात भरतीसाठी 162 सेंटिमीटर उंचीची अट आहे. 162 सेंटिमीटर उंची असेल तरच या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र ठरतील. पण यापेक्षा जास्त उमेदवारी असतानाही आमची निवड केली गेली नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मुली आहोत. हा आमच्या भविष्याशी खेळ सुरू आहे, असं या आक्रमक झालेल्या तरूणींचं म्हणणं आहे. यातील एका तरूणीने भरल्या डोळ्यांनी टीव्ही 9 मराठीकडे आपली व्यथा मांडली. माझ्या पायावर, हातावर काठीने मारहाण करण्यात आली. आम्हाला न्याय हवा. आम्ही ग्रामीण भागातून आलोय. आमचं भविष्य असं अंधारात लोटू नये, असं या तरूणीने म्हटलं आहे.

Published on: Feb 04, 2023 12:01 PM