Nawab Malik | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत नवाब मलिकांचे खलबते, भेटीनंतर काय म्हणाले मलिक?
नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार असल्याचं मलिक म्हणाले होते. त्यानंतर आज मलिक यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी वानखेडेंवर कारवाईबाबत संकेत दिले आहेत.
मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार असल्याचं मलिक म्हणाले होते. त्यानंतर आज मलिक यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी वानखेडेंवर कारवाईबाबत संकेत दिले आहेत.
“मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्ज केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे. मी जे आरोप करत होतो, त्यात कुठं तरी भर देणारा हा प्रकार आहे. ज्याप्रकारे मी अगोदरच जाहीर केलं होतं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. आज दोघांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीच्याबाबत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितरूपाने यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असं मला आश्वासन देण्यात आलेलं आहे,” असं मलिक म्हणाले.