Mumbai Rain | मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रक पलटी, पावसामुळे अंदाज न आल्याने अपघात

Mumbai Rain | मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रक पलटी, पावसामुळे अंदाज न आल्याने अपघात

| Updated on: Jun 10, 2021 | 12:15 AM

पावसाचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटी झाला. यामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुसळधार पावसामुळे पहिल्याच पावसात मुंबईकरांचा दाणादाण उडाली. नुकतंच मुंबईतील एक्सप्रेस हायवेवर ट्रक पलटी झाली. पावसाचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटी झाला. यामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. दरम्यान या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Mumbai Express Highway Truck overturned due to heavy rain)